देवगड : देवगड शहरामध्ये महालक्ष्मी ज्वेलर्सचे मालक संजय सोमण यांनी नव्याने श्री इमिटेशन ज्वेलरी शोरूमचा शानदार प्रारंभ झाला. आज रविवारी या शोरूमचा शुभारंभ कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. देवगड कॉलेज रोड येथील सौरभ कॉम्प्लेक्स येथे हे शोरूम सुरू करण्यात आले आहे. देवगड तालुक्यामधील हे पहिलेच शोरूम आहे.

देवगडच्या या शोरूममुळे महिला वर्गांना असंख्य व्हरायटी असलेल्या मनपसंत अशा इमिटेशन ज्वेलरी खरेदी करायला मिळणार आहे .या शोरूमच्या शुभारंभाप्रसंगी आमदार नितेश राणे,श्री इमिटेशन ज्वेलरीचे मालक संजय सोमण, सौ स्वाती सोमण,संयम सोमण, आयुषी सोमण,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे, माजी नगराध्यक्षा सौ प्रियांका साळस्कर, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, दिनेश सोमण,डॉ प्रमोद आपटे, सुमित भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.या शोरूमला देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी देखील भेट देऊन शोरूमचे मालक श्री व सौ सोमण यांना यांना शुभेच्छा दिल्या.





