शनिवार २९ नोव्हेंबर रोजी श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र जपाचे आयोजन
देवगड: श्री रामेश्वर प्रसादिक मंडळ, मिठबाव मुंबई यांच्या वतीने श्री विठ्ठल रखुमाई समता मंदिर मिठबाव येथे सात प्रहरांचा अखंड हरिनाम सोहळा सोमवार, दि. १ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता भक्तिमय वातावरणात सुरू होणार आहे.
यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून होणारे कार्यक्रम (शनिवार दि. २९ नोव्हेंबर २०२५)सकाळी ८.०० वा. श्री विठ्ठल रखुमाई विधिवत पूजा,सकाळी ९.३० ते ११.३० वा. श्री विष्णु सहस्रनाम स्तोत्र जप,दुपारी ४.०० वा.श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ७.०० वा, सांजमहाआरती,रात्री ९.३० वा. डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा श्री संदीप लोके, लिंगडाळगाव देवगड विरुद्ध बुवा श्री विनोद चव्हाण, कुडाळ यांचे मध्ये होणार आहे.
सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजक श्री रामेश्वर प्रसादिक मंडळ, मिठबाव / मुंबईच्या वतीने करण्यात आले आहे.





