शहर विकास आघाडीला एक संधी द्या ; संधीचे सोने करु
कणकवली (प्रतिनिधी)कणकवली प्रभाग क्रमांक 8 मधील मतदारांच्या गाठी भेटी घेत असताना मतदारांचा शहरविकास आघाडी ला चांगला प्रतिसाद मिळत आहे.असे प्रतिपादन शहर विकास आघाडीचे उमेदवार लुकेश गोविंद कांबळे यांनी केले.प्रभाग क्रमांक 8 हा ग्रामीण भाग आहे.मात्र सताधाऱ्यांकडून मागील पाच वर्षात विकासाची कामे झाली नसल्याने विकासापासून हा प्रभाग दुर्लक्षीत राहिला आहे.मतदारांनी शहर विकास आघाडीला कणकवलीकरांनी एक संधी द्या.संधीचे सोने करु.आम्ही शहर विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीच्या विकासाचे व्हिजन तयार आहे. या प्रभागात विकासकामे करुन प्रभागाचा चेहरामोहरा बदलू.असा विश्वास लुकेश कांबळे यांनी व्यक्त केला.ते प्रभाग 8 मध्ये मतदारांच्या गाठी भेटी घेत होते.यावेळी ते बोलत होते.
यावेळी शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर, प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार तेजस राणे, शेखर राणे महेश राणे जितेंद्र राणे राजेश राणे धीरज मेस्त्री, सुदीप कांबळे अनिल जाधव बाबुराव कांबळे नितेश कांबळे ऋषी कांबळे माजी नगरसेविका विशाखा कांबळी ,सारिका कांबळे हेमलता कांबळे, सायली जाधव, वैशाली कांबळी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,मतदारांचा शहरविकास विकास आघाडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे कणकवलीत सत्ता परिवर्तन अटळ आहे.शहर विकास आघाडीच्या माध्यमातून कणकवली शहराचा शाश्वत विकास करु असा विश्वास लुकेश कांबळे यांनी व्यक्त केला.



