भाजपाच्या देवगड शहराध्यक्षपदी वैभव कळंगुटकर यांची आज निवड करण्यात आली.
वैभव कळंगुटकर हे भाजपाच्या सोशल मीडिया सेलचे संयोजक म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी देवगड तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पद तसेच स्वाभिमान संघटनेत युवक तालुकाध्यक्ष पद भूषवले आहे. खासदार नारायण राणे यांचे ते खंदे समर्थक मानले जातात.
देवगड शहराध्यक्षपदी त्यांची झालेली निवड देवगड मंडळाचे तालुकाध्यक्ष राजा भुजबळ यांनी जाहीर केली.
त्याच्या निवडीनंतर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे,जिल्हासरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ यांचे विशेष आभार वैभव करंगुटकर यांनी व्यक्त केले.
यावेळी संदीप साटम, माजी आमदार अँड अजित गोगटे, उल्हास मंचेकर, मणचेकर योगेश चांदोस्कर, शरद ठूकरुल, अमित साटम, भाजपाचे नगरसेवक व भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.