कोलंबो : कर्णधार रोहित शर्माने संथ सुरुवातीनंतर गियर बदलले आणि 42 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 15 षटकांनंतर भारताने एकही विकेट न गमावता 115 धावा केल्या आहेत.
कर्णधार रोहित शर्माने वनडे कारकिर्दीतील 50 वे अर्धशतक झळकावले. त्याने शादाब खानच्या चेंडूवर षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले.
सध्या रोहित 46 चेंडूत 55 धावा आणि शुभमन गिल 44 चेंडूत 53 धावा करत फलंदाजी करत आहे.




