शामल मांजरेकर-पिळणकर यांना ‘उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार’ सन्मानपूर्वक प्रदान.! ; शिक्षण मंत्री केसरकर,पालकमंत्री चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती.

112

सिंधुदुर्गनगरी : आज जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण येथील शरद कृषी भवन येथे करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर (भा.प्र. से.), प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार केंद्रशाळा वायंगणी-सुरंगपाणी, वेंगुर्ला येथील प्राथमिक शिक्षिका सौ. शामल शंकर मांजरेकर/पिळणकर यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.