मळेवाड – कोंडुरेच्या शिरपेचात अजून एक तुरा.! ; जिल्हास्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान .!

139

सावंतवाडी : ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेला जिल्हास्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. या पुरस्काराचे वितरण आज ओरोस येथील शरदचंद्र कृषी भवन येथे आयोजित कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.यावेळी उपसरपंच हेमंत मराठे, विस्तार अधिकारी गजानन धर्णे, ग्रामसेवक सोमा राऊळ उपस्थित होते. या पुरस्काराने ग्रामपंचायत मळेवाड – कोंडुरेच्या शिरपेचात आणखीन एक तुरा रोवला गेला आहे.