इनरव्हील क्लबचा ‘वॉकॅथॉन’ उपक्रम कौतुकास्पद.! ; शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे प्रतिपादन, भल्या पहाटे केले उद्घाटन.!

90

सावंतवाडी : येथील ‘इनरव्हील क्लब’ नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत असून त्यांच्या प्रत्येक उपक्रमाला सावंतवाडीकरांची भरभरून दाद असते. आजच्या ‘वॉकॅथॉन’ उपक्रमाला निश्चितच शहरवासियांचा उदंड प्रतिसाद लाभेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथील इनरव्हील क्लबच्या ‘वॉकॅथॉन’ उपक्रमाचे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. दरम्यान सकाळी ६ वाजता मंत्री केसरकर यांनी आपल्या हस्ते झेंडा दाखवून सदर उपक्रमाचे उद्घाटन केले.

यावेळी इनरव्हीलच्या अध्यक्ष रिया रेडीज, सचिव डॉ. मीना जोशी, खजिनदार श्रीया नाईक, आयएसओ डॉ. नेत्रा सावंत, व्हाईस प्रेसिडेंट प्रा. डॉ. सुमेधा धुरी, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांच्यासह इनरव्हील कपच्या सर्व सदस्या, तसेच रोटरी इंटरनॅशनल क्लबचे सदस्य, आणि शहरातील महिला, पुरुष आणि सहभागी नागरीक देखील उपस्थित होते. दरम्यान इनरव्हीलच्या या उपक्रमाला शहरवासियांचा उदंड प्रतिसाद लाभला.