…तोपर्यंत वैभववाडी विकास आराखडा मंजुरीस पाठवू नका ! ; मनसेची मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी.

23

वैभववाडी : वैभववाडी शहर विकास आराखड्याबाबत जनतेमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर होत नाही तोपर्यंत आराखडा अंतिम मंजुरीसाठी पाठवू नये, अशी मागणी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष सचिन तावडे यांनी न. पं. मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी नगराध्यक्षा नेहा माईणकर यांच्याकडे सुपूर्द केले. वैभववाडी नगरपंचायतीचा शहर विका आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे. हा विकास आराखडा बनविताना योग्य प्रसिद्धी करणे क्रमप्राप्त आहे. परंतु नगरपंचायत नोटीस बोर्डावर तो चार दिवस लावून नंतर काढून टाकण्यात आला.