कणकवली : सिंधुदुर्ग बँक शाखा सांगवे येथे नवीन अद्यावत एटीएम बसवावे, तसेच गणेश चतुर्थीमध्ये कनेडी बाजारपेठमध्ये सिंधुदुर्ग बँकेचे फिरते एटीएम उपलब्ध करून लोकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा जि. प. माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्याकडे केली. या प्रश्नी गोट्या सावंत यांनी दळवी यांची भेट घेतली.





