कणकवली : कोकण रेल्वे मार्ग हा भारताच्या कानाकोपऱ्याला जवळच्या अंतराने जोडणारा मार्ग आहे. या मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त संख्येने प्रवासी गाड्यांसह मालवाहू गाड्या धावत आहेत. काही राज्यांतील प्रवासी या मार्गावरून आपल्या भागातूनही प्रवासी गाड्या सोडाव्यात, अशी मागणी करीत आहेत. त्यामुळे या मार्गाचे दुपदरीकरण जलद गतीने सुरू व्हायला हवे. त्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे, असे आवाहन मोहन केळुसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.





