‘त्या’ उड्डाण पुलाखाली लावलेल्या वाहनांवर होणार कारवाई – P. I. अमित यादव.

45

कणकवली : शहरातील हायवे उड्डाणपुलाखाली गेले काही महिन्यांपासून विविध वाहने अनधिकृतरित्या पार्किंग करण्यात आली आहेत. त्यातील ओव्हरब्रिजखाली पार्किंग केलेला एक डंपर शुक्रवारी रात्री ११ वाजता चोरीला गेला. त्यामुळे कणकवली पोलीस सतर्क झाले असून अशा अनधिकृत पार्किंग केलेल्या अवजड वाहनांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून कारवाईचे संकेत कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिले आहेत.