कणकवली : तालुक्यातील सावडाव काटेवाडी येथील सत्यवान शंकर वारंग (६५) यांच्याकडे येत-जात असलेला कामगार मंगेश राजाराम विणकर (४६, रा. वारगाव) यांच्यात झटापट होऊन कोयत्याने एकमेकांवर हल्ला होवून गंभीर जखमा झाल्या आहे. ही झटापट होत असताना सोडवण्यासाठी सावित्री सत्यवान वारंग (६०) मध्ये आल्याने त्याच्याही डोळ्याला, हाताला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळतात कणकवली पोलिस घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. परंतु कणकवली पोलीस ठाण्यात या घटनेची कोणतेही नोंद नाही.





