अमरावती : मोठी बातमी समोर येत आहे. बॉलिवूड किंग शाहरुख खान नंतर आता सचिन तेंडूलकर देखील एका जाहिरातीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. एका ऑनलाईन गेमची जाहिरात करणं भारतरत्न, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला भोवण्याची चिन्हं आहेत. सचिन तेंडूलकर करत असलेल्या एका ऑनलाईन गेमच्या जाहिरातीमुळे आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. जाहिरातया जाहिरातप्रकरणात येत्या 30 ऑगस्टला सचिन तेंडूलकरला वकिलामार्फत कायदेशील नोटीस बजावणार असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, एका भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तीनं कुठल्या जाहिराती कराव्यात, कुठल्या करू नयेत याची आचारसंहिता आहे. त्यामुळे आपण सचिन तेंडूलकरला वकिलामार्फत येत्या 30 ऑगस्टला कायदेशिर नोटीस पाठवणार आहोत. त्यानंतर आंदोलनाबाबत निर्णय घेऊ असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी बॉलिवूड किंग शाहरुख खान याच्या बंगल्याबाहेर देखील जाहिरातीच्या मुद्द्यावरूनच आंदोलन झालं होतं. जमावाने आक्रमक होतं शाहरुखच्या बंगल्याबाहेर आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी शाहरुखच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ केली होती. या आंदोलनावेळी काही आंदोलकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता शाहरुख खाननंतर सचिन तेंडूलकरच्या अडचणीमध्ये देखील या ऑनलाईन गेमच्या जाहिरातीमुळे वाढ होण्याची शक्यता





