जेष्ठ व्यापारी शंकर उर्फ भाऊ वळंजू यांचा राज्य वस्तू व सेवा कर ओरोस तर्फे सन्मान..!

40

देवगड  : विहित मुदतीत विवरणपत्र दाखल करून सर्वाधिक वस्तू व सेवा कराचा भरणा करणारे बांदा येथील ज्येष्ठ व्यापारी तसेच हिंदळे गावचे सुपुत्र भाऊ वळंजू यांना राज्य वस्तू व सेवा कर ओरोस यांच्यातर्फे आदर्श व्यापारी म्हणून सन्मानित करण्यात आले.

या मिळालेल्या सन्मानाबद्दल हिंदळे ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. जिल्ह्यात विहित वेळेत सर्वाधिक कर भरणा करणाऱ्या व्यापाऱ्यांना गौरविण्यात येते. यामध्ये वळंजू यांचा समावेश आहे. हिंदळे गावासाठी हे अभिमानास्पद असल्याचे माजी सभापती सुनीलभाई पारकर यांनी सांगितले.

यावेळी हिंदळे सरपंच मकरंद शिंदे,माजी सभापती सुनीलभाई पारकर, हिंदळे सोसायटी चेरमन मनोहर मोदी,बबन हळदणकर, मनोज जाधव,दादू गिरकर,सुधीर पारकर, सदानंद कुंभार आदींसह वळंजू कुटुंबीय उपस्थित होते,