देवगड : मुंबई दादर येथे पार पडलेल्या ५६ व्या महाराष्ट्र स्टेट कॅरम चॅम्पियनशिप मध्ये पूर्वा दीपक केतकर हिने यश प्राप्त केले आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा पार पडली होती. ग्रामसेवक दीपक केतकर यांची मुलगी पूर्वा केतकरची नॅशनल कॅरम स्पर्धेत निवड झाली आहे. पूर्वा दीपक केतकर ही देवगड इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी आहे. पूर्वाच्या निवडीबाबत देवगड कॅरम असोसिएशनच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.





