नमो चषक २०२४ बुद्धिबळ स्पर्धेत
अभिषेक सांगळे,सुश्रुत नालंग व
गायत्री राठोड प्रथम
देवगड तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने केले होते आयोजन
देवगड (प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने नमो चषक 2024 बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे करण्यात आले होते. ही स्पर्धा तीन गटात संपन्न झाली. यामध्ये खुला गटातून अभिषेक सांगळे,अठरा वर्षांखालील गटातून सुश्रुत नालंग तर महिला गटातून गायत्री राठोड यांनी प्रथम क्रमांक मिळविले.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संदीप मेस्त्री,विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे,गौरव यादव भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमित साटम,शहर अध्यक्ष दयानंद पाटील,तसेच अन्य भाजप पदाधिकारी नगरसेवक नगरसेविका यांच्या हस्ते पार पडला .या वेळी संदीप मेस्त्री व मनोज रावराणे यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.
या स्पर्धेतील विजेते
खुला गट प्रथम क्रमांक :अभिषेक सांगळे रोख रु १००००/- चषक, व्दितीय क्रमांक: संदेश गवंडी रोख रु ५०००/- चषक (दोन्ही देवगड), तृतीय क्रमांक:अक्षय देवलकर (वैभववाडी) ३०००/- चषक , चतुर्थ क्रमांक: आर्यन
हऱयाण रोख रु २०००/- चषक, पंचम क्रमांक : सुयश पेठे (देवगड)रोख रु१०००/- चषक
तसेच जेष्ठ खेळाडू मनोहर घाडी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
१८ वर्षाखालील प्रथम क्रमांक :सुश्रुत नालंग रोख रु ५०००/- चषक व्दितीय क्रमांक :मिहीर सकपाळ (देवगड) ३०००/- चषक तृतीय क्रमांक:वरद तवटे रु २०००/- चषक,चतुर्थ क्रमांक : रोहित सावंत रोख रु १०००/- चषक, पंचम क्रमांक : सात्विक मालंडकर रोख रु १०००/- चषक (कणकवली)
तर महिला गट • प्रथम क्रमांक : गायत्री राठोड (कणकवली)३०००/- चषक,व्दितीय क्रमांक तनिष्का आडेलकर (कणकवली)रु २०००/- चषक, तृतीय क्रमांक :मधुरा पाटील( कणकवली) १०००/- चषक, चतुर्थ,क्रमांक :मिलन सुलेभावे रु ७००/- चषक,पंचम क्रमांक : जुई उबाळे (कणकवली)रु ५००/- चषक प्रदान करण्यात आले. या स्पर्धेमध्ये सुमारे १२० स्पर्धकांनी सहभाग घेतला स्पर्धेला उस्फुर्त असा प्रतिसाद लाभला आहे.सूत्रसंचालन हृतिक धुरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार दयानंद पाटील यांनी व्यक्त केले.





