Home महाराष्ट्र देवगड शिवभक्त ग्रामस्थ मंडळ, सडे वाघोटनच्या शिवजयंती उत्सवाला सुरुवात..

शिवभक्त ग्रामस्थ मंडळ, सडे वाघोटनच्या शिवजयंती उत्सवाला सुरुवात..

71

शिवभक्त ग्रामस्थ मंडळ, सडे वाघोटनच्या शिवजयंती उत्सवाला सुरुवात..

विजयदुर्ग (प्रतिनिधी) 

 

प्रतिवर्षाप्रमाणे शिवभक्त ग्रामस्थ मंडळ, सडे वाघोटण च्या शिवजयंती उत्सवाला विजयदुर्ग किल्ल्यापासून सुरूवात झाली. ढोलताशांच्या गजरात आणि ‘जय भवानी जय शिवाजी’ गर्जना करत या मंडळाचे १५० कार्यकर्ते विजयदुर्ग किल्ल्यामध्ये आले. किल्ल्यातील भवानी मातेच्या मंदिरात श्रीफळ ठेवून आणि पूजा अर्चा करून छत्रपतींची मूर्ती सडे वाघोटण येथे रवाना झाली. यावेळी किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रेरणोत्सव समितीचे उपाध्यक्ष शरद डोंगरे, सचिव बाळा कदम, सह सचिव यशपाल जैतापकर, संजय सावंत, दिनेश जावकर, महेश गुरव,अनंत गवाणकर, रामदास घारकर तसेच शिवभक्त उत्साही ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष काशिराम जोशी, उपाध्यक्ष महेश राऊळ, सचिव अजिंक्य जोशी, खजिनदार गणेश वानिवडेकर आणि अक्षय वानिवडेकर, सुशील टुकरुल, दिनेश जोशी, वैभव येरम आणि सुनील जोशी आदी 150 कार्यकर्ते उपस्थित होते.
गेले ८ वर्ष सडे वाघोटण येथील शिवभक्त उत्साही ग्रामस्थ मंडळ विजयदुर्ग किल्ल्यावरून आपला शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. विजयदुर्ग किल्ल्यातील भवानी मातेच्या चरणी छत्रपती शिवाजी महाराज येत असतात. विजयदुर्ग पासून २४ किमी वर असलेल्या सडे वाघोटण येथील शिवभक्त उत्साही मंडळाला विजयदुर्ग किल्ल्याचं आकर्षण आहे. महाराजांनी विजयदुर्ग किल्ला सर केल्यावर त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली. त्यामुळेच या गावातील सर्व शिवभक्त गेली ८ वर्षे विजयदुर्ग किल्ल्यावरून आपल्या शिवजयंती उत्सवाची सुरूवात करत असतात. दरम्यान, विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सोनवलकर यांनीही या प्रसंगी उपस्थित राहून छत्रपतींना मानवंदना दिली. किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती मार्फत सडे वाघोटण येथील उपस्थित सर्व शिवभक्ती कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या प्रसंगामुळे विजयदुर्ग किल्ले परिसरामध्ये शिवमय वातावरण निर्माण झालं होतं. किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर आणि अध्यक्ष प्रसाद देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिवसेवा संपन्न झाली.