कुणकेश्वर येथे २३ फेब्रुवारी रोजी परीट
समाजाचा मेळावा
देवगड (प्रतिनिधी)
संत गाडगेबाबा महाराज जयंती व स्नेह मेळावा परीट समाजाच्या वतीने गुरुवार २३ फेब्रुवारी २०२४ रोजी कुणकेश्वर पावणादेवी मंदिर शेजारी रामचंद्र धोंडू कुणकेश्वरकर याच्या प्रागंणात आयोजित करण्यात आला आहे . या मेळाव्यास प्रमुख अतिथी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या उपस्थित राहणार आहेत.
या जयंती उत्सवानिमित्त होणारे कार्यक्रम सकाळी ८ वा. श्री देव कुणकेश्वर मंदिर परिसर व समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम,१० वा.नंतर नियोजित कार्यक्रम,दुपारी ३ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ,सायं ५ वा. ह. भ. प. बुवा विनायक आजगावकर (लक्ष्मी वाडी कुडाळ) यांचे संत गाडगेबाबा यांच्या विचारांवर आधारित सुश्राव्य किर्तन तसेच श्री संत गाडगे महाराज कलानिकेतन आंदुर्ले प्रस्तुत गाडग्यातील शिदोरी हा संगीत कार्यक्रम,
आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व परीट बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे. असे आवाहन श्री संत गाडगे महाराज परीट सेवा संघ देवगडच्या वतीने अध्यक्ष विजय पाटील व सचिव शरद लाड यांनी केले आहे.





