मुंबई : मुंबई विद्यापीठ अधिसभा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदारयादी तयार करण्यात येत असून यासाठी विद्यापीठाने नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. या नोंदणीसाठी आवश्यक असलेले पदवी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे १७ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. डिसेंबर २०२१ आणि तत्पूर्वी पदवी प्रदान करण्यात आलेल्या पदवीधरांची मतदारयादीसाठी नाव नोंदणी करण्यात येत आहे. पदवी प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेकांना नाव नोंदणी करता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे १७ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.
Home महाराष्ट्र पदवीधरांसाठी महत्वाची बातमी | प्रमाणपत्रासाठी १७ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करता येणार…





