सन्मित्र मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय निमंत्रित पुरुष व महिला खुलागट कबड्डी स्पर्धा स्पर्धांचे आयोजन
जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार उद्या
देवगड (प्रतिनिधी)दि २१ फेब्रु . २०२४
जामसंडे सन्मित्र मंडळाच्या जामसंडेच्या वतीने यावर्षी जिल्हास्तर पुरुष व महिला(निमंत्रीत) खुलागट कबड्डी स्पर्धा दि. २२ ते २३ फेब्रुवारी
२०२४ रोजी आयोजीत केली आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दि. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता
वाजता संपन्न होणार असून या उद्घाटन सोहळ्याला उद्घाटक म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेचे
अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी आमदार अँड अजित गोगटे यांनी दिली. सर्व क्रीडा रसिकांनी या कबड्डी स्पर्धेत उपस्थित राहावे असे आवाहन
कार्यवाह जामसंडे सन्मित्र मंडळ यांचे वतीने करण्यात आले आहे.





