सावंतवाडी येथे नाद संगीत अकॅडेमीच्या सावंतवाडी शाखेचा संगीतमय शुभारंभ

225

सावंतवाडी येथे नाद संगीत अकॅडेमीच्या सावंतवाडी शाखेचा संगीतमय शुभारंभ

सावंतवाडी (प्रतिनिधी)

आदित्य चंद्रशेखर आचरेकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या नाद संगीत अकॅडेमीच्या सावंतवाडी शाखेचे रविवार दिनांक १८ फेब्रु. २०२४ रोजी माननीय श्री. राजन माडये सर यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला माननीय श्री. प्रमोद मुंडये हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
न्यू खासकीलवाडा, क्रिकेट अकॅडेमी शेजारील नवीन जागेत करण्यात आलेल्या या शुभारंभ सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत फित कापून करण्यात आली. त्यानंतर दीप प्रज्वलन करून देवी सरस्वतीचे पूजन झाले. याप्रसंगी कु. पवन पवार याने शारदास्तवन केले.
अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीताने संगीतमय संध्येची सुरुवात केली तसेच मैथिली सावंत हिने गणेशस्तवन सदर कले. अकॅडेमीचे सह- संस्थापक श्री. गोपाळ पवार यांनी प्रास्ताविक केले आणि मान्यवरांनी आपल्या आशीर्वादपर शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुमधुर गायिका कु. अमृता पेडणेकर यांच्या ख्यालगायनाने परिसर मंत्रमुग्ध झाला. श्री आदित्य आचरेकर (संगीत विशारद) यांनी आपल्या हार्मोनियम वादनाने रसिकांना भुरळ पाडली. त्यात त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांची साथ लाभली.
शेवटच्या टप्प्यात सिंधुदुर्गातील प्रसिद्ध गायक व गायिका तसेच अकॅडेमीचे शिक्षक, श्री. प्रफुल्ल रेवणकर, कु. अमृता पेडणेकर, सौ. मान्यता कुंटे यांनी नादसंध्या हा कार्यक्रम सादर केला. यात त्यांना अतुल उमळकर, मेघपर्ण एकावडे, श्याम तेंडोलकर यांची संगीतसाथ लाभली. संपूर्ण कार्यक्रमाचे मनमोहक सूत्रसंचाचालन श्री. अक्षय सातार्डेकर यांनी केले. तर ध्वनिसंयोजन सर्वेश व राज पिंगूळकर यांनी केले.
कार्यक्रमाला दूरदर्शनचे संगीत दिग्दर्शक व वाहिनीवरील किलबिल कार्यकरांचे संचालक श्री विश्वनाथ कामत तसेच थोर नाट्यकर्मी फातरफेकर सर यांनी उपस्थिती दर्शवली.
याशिवाय गोव्याचे नावाजलेले हार्मोनियम वादक माननीय डॉ. श्री. सुधांशु कुलकर्णी, सेवानिवृत्त शिक्षक श्री. किरण वेटे, डॉ. शिवानी गवंडे, डॉ. संजीव गवंडे , श्री. संजय पिंगुळकर, श्री योगेश नाडकर्णी व सावंतवाडीतील इतर प्रतिष्ठित डॉक्टर आणि शिक्षक यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या.
नव्या जागेची उपलब्धता, सुशोभीकरण करून माजगाव हायस्कूल चे शिक्षक व संगीत प्रेमी श्री. रावजी उर्फ राज सावंत यांनी मोलाचा हातभार लावला. नव्याने सुरू झालेल्या पिंगूळकर अँड सन्स यांच्या PNG ज्वेलर्स कुडाळ आणि वृंदावन केमिकल फ्री फार्म यांचे आर्थिक सहाय्य लाभले.
नाद संगीत अकॅडेमीच्या आतापर्यंत सिंधुदुर्गात कुडाळ, वेंगुर्ला, परूळे, कणकवली, शिरगाव, सावंतवाडी आणि रत्नागिरीत शाखा सुरू आहेत. त्याचप्रमाणे Youtube Naad Harmonium या चॅनेल चे १२००० सबस्क्रायबर्स पूर्ण अहेत त्याच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षणही दिले जाते.