बांदा येथील केशव महाजन यांचे निधन
बांदा दि.20 (प्रतिनिधी)-
बांदा येथिल केशव उर्फ शंभू अनंत महाजन यांचे मंगळवारी पहाटे सावंतवाडी येथे अल्पशा आजाराने निधन झाले.मुळचे बांद्याचे असलेले केशव महाजन सातारा येथे वास्तव्यास होते. मंगळवारी सकाळी बांदा येथिल स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, मुलगी,जावई,नातू,भाऊ,वहीनी असा परिवार आहे.बांदा येथिल ज्येष्ठ भजनकर्मी गिरिश महाजन यांचे ज्येष्ठ बंधू होत.





