किंजवडे ग्रामपंचायतीला दिली सोलापूर जिल्हा परिषदच्या टिमने भेट दिली

29

किंजवडे ग्रामपंचायतीला दिली
सोलापूर जिल्हा परिषदच्या टिमने भेट दिली

स्वच्छता विषयक उपक्रमांची माहिती घेत केले कौतुक

देवगड (स्वप्नील लोके)दि २०फेब्रुवारी २०२४

देवगड तालुक्यातील किंजवडे ग्रा.पं. तीला नुकतीच राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान सन २०२३-२४ अंतर्गत सोलापूर जिल्हा परिषद टीमने भेट दिली व ग्रा.पं.तीने स्वच्छता विषयक राबविलेल्या विविध उपक्रमाची माहीती घेतली.
सोलापूर जिल्हातील माळशिरस व अक्कलकोट येथील गटविकास अधिकारी,विस्तार अधिकारी यांचेसह सरपंच उपसरपंच सदस्य मुख्य सेविका उपस्थित होते. यावेळी किंजवडे गावचे सरपंच श्री.संतोष किंजवडेकर यांनी समिती सदस्याचे स्वागत केले. यावेळी. ग्रामपंचायत सदस्य श्री.किरण टेबुलकर, श्री.प्रविण तेली व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
किंजवडे ग्रामसेवक शिवराज राठोड यांनी गावाची व ग्रामपंच्यायतीने राबविलेल्या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.समितीने गावातील पाऊस पाणी संकलन प्रकल्प,गावातील सार्वजनिक वाचनालय आणि सोलर आँन ग्रेड सिस्टीम.डिजिटल अंगणवाडी. गावातील ऐतिहासिक वृक्ष गणना, गावातील जैवविविधता बदल माहिती व प्रत्यक्ष पाहणी. झ-यावरील पाणी पुरवठा. बायोगॅस संयत्र, शौचालय वापर व देखभाल संदर्भात माहिती, विविध उपक्रमांना भेट दिली माहिती घेतली. महिला बचत गटाच्या विविध प्रकारच्या उत्पादन पाहून समितीने मनापासून कौतुक केले.
तसेच जि.प. सोलापूर अंतर्गत उपस्थित असलेल्या सरपंच उपसरपंच यांनी विविध उपक्रमांची माहीती घेत यातील कोणता प्रकल्प आपल्या गावात राबवता येईल . याचा अभ्यास केला व किंजवडे गावचे ग्रामदैवत श्री.स्थानेश्वर देवस्थानचे दर्शन घेऊन गावातील मिळालेल्या माहिती बदल समाधान व्यक्त केले.सदर समिती मा. मनीषा आव्हाळे भा.प्र. से. मुख्यकार्यकारी अधिकारी व श्री इशादिन शेळकंदे उपमुख्यकार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांचे मार्गदर्शना खाली आले होते. सदर अभ्यास दौऱ्यात गटविकास अधिकारी श्री विनायक गुळवे , गटविकास अधिकारी चिलवंत सहाय्यक गटविकास अधिकारी श्री सुतार, घाडगे, लोंढे,भोरे, चव्हाण, पंचायत व आरोग्य खात्याचे विस्तार अधिकारी,सरपंच, श्रीमती लुबाळ, श्रीमती ढेकळे,श्री खंदारे, श्री गवंडी उपसरपंच, अमोल महिंद्रकर आर जी पी एस ए सर्व सर्वे, व सोलापूर जिल्हा परिषद कडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.