व्ही .एन नाबर इंग्लिश स्कूल मडुरा प्रशालेत शिवजयंती साजरी
बांदा (मंगल कामत)दि २० फेब्रुवारी २०२४
श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचालित व्ही एन नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल मधुरा येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी शिवजयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला . प्रमुख पाहुणे म्हणून लोकल कमिटी सदस्य श्री लक्ष्मण गवस सर व सुरेश गावडे सर उपस्थित होते. त्यानंतर मुख्याध्यापिका निती साळगावकर मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर पाहुण्यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी खूप छान अशी भाषणे दिली जसे की बाजीप्रभू, जिजामाता, शिवाजी, महाराज तानाजी मालुसरे व अनेक नृत्य साजरे केले व छानसा पोवाडा देखील म्हणण्यात आला . त्यानंतर 51 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात तसेच दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय ‘मला आवडलेला शिवरायांचा मावळा ‘यामध्ये द्वितीय पारितोषिक इयत्ता पहिलीचा विद्यार्थी सार्थक घनश्याम वालावलकर यांनी मिळवून शाळेची शोभा वाढवली. व कौतुकास्पद प्रमुख पाहुणे लक्ष्मण गवस सर यांनी पुष्पगुच्छ देऊन व पारितोषिक देऊन त्याचे अभिनंदन केले. त्यानंतर सहशिक्षिका तेजस्वी गावडे यांनी शिवाजी महाराजांबद्दल व महाराजांची कर्तुत्वांना विषयी माहिती सांगितली. उपस्थित मुख्याध्यापिका नीती साळगावकर सहशिक्षिका वैलांकानी रोड्रिक्स प्रतिक्षा शिरोडकर उपस्थित होते.
सूत्रसंचालन सहशिक्षिका तेजस्वी गावडे तर आभार सहशिक्षिका प्राची परब यांनी मानले.





