सन्मित्र मंडळ जामसंडेच्या वतीने  २० ते २३ फेब्रुवारी या कालावधीत क्रिडा महोत्सवाचे आयोजन

18
सन्मित्र मंडळ जामसंडेच्या वतीने  २० ते २३ फेब्रुवारी या कालावधीत क्रिडा महोत्सवाचे आयोजन
२० फेब्रुवारी कॅरम, तर २२ फेब्रुवारीला कबड्डीचा होणार शुभारंभ
देवगड (प्रतिनिधी)दि.१८ फेब्रु.
२०२४
जामसंडे सन्मित्र मंडळ, जामसंडे यांच्या वतीने जिल्हास्तरीय निमंत्रित पुरुष व महिला खुलागट कबड्डी स्पर्धा,जिल्हास्तरीय निमंत्रित कॅरम स्पर्धांचे आयोजन जामसंडे सन्मित्र मंडळ, जामसंडेच्या वतीने यावर्षी दि. २० ते २३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत क्रिडा महोत्सव आयोजीत केला असून यामध्ये जिल्हास्तर पुरुष व महिला (निमंत्रित) खुलागट कबड्डी स्पर्धा, जिल्हास्तर कॅरम (निमंत्रित) स्पर्धा या खेळांचा समावेश आहे.
    यामध्ये जिल्हास्तर कॅरम स्पर्धा (निमंत्रित) दि. २० ते २१ फेब्रुवारी २०२४ रोजी आणि जिल्हास्तर पुरुष व महिला (निमंत्रित) खुलागट कबड्डी स्पर्धा, २२ ते २३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पार पडतील. 
           यास्पर्धा आयोजनासाठी मंडळाला सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन व देवगड तालुका कबड्डी असोसिएशन,सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशन देवगड तालुका कॅरम असोसिएशन यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे.
मंडळाने गेली १६ वर्षे स्थानिक गट, व्यावसायिक गट व महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी चषक (शिवशाही), कुमार गट अशा विविध पातळीवरील कबड्डी स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन केले आहे. यासाठी मंडळाला महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा उत्कृष्ठ स्पर्धा आयोजनाचा पुरस्कारही मिळाला आहे.
कबड्डी स्पर्धा दिवस-रात्र प्रकाशझोतात होणार असून यासाठी 2 मैदाने करणेत येणार आहेत. तसेच प्रेक्षक गॅलरी, मान्यवर गॅलरी, भव्य व्यासपिठ उभारणेत येणार आहे.
कॅरम स्पर्धेचा उद्घाघाटन सोहळा दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता संपन्न होणार
आहे. तर कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ दि. २२ रोजी सायं. ६ वाजता होणार आहे. दि. २३ फेब्रुवारी रोजी मंडळाचे प्रमुख सल्लागार व आधारस्तंभ माजी आम. अजित गोगटे यांचा जन्मदिन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करणेत येणार आहे. क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन व समारोप प्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.सदर कबड्डी स्पर्धा विद्या विकास मंडळाच्या कै. इंदिराबाई ठाकुर क्रीडा नगरीत होणार आहेत. तर कॅरम स्पर्धा कै. मोरेश्वर जनार्दन गोगटे सांस्कृतीक भवन मध्ये होणार आहे.