विलवडेत ‘कृषी यात्रिकीकरण मेळावा’ बुधवारी…!

बांदा : विलवडे ग्रामपंचायत, महाराष्ट्र शासन कृषी विभाग,व विलवडे येथील सर्व महिला बचत गट यांच्या सयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त बुधवारी ८ मार्च रोजी ‘कृषी यात्रिकीकरण मेळावा’आयोजन करण्यात आले आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत पावर टिलर,ग्रासकटर,चैन साँ मशिन, तुषार सिंचन,शेततळे,स् लास्टिक मल्चींग,प़ँक हाउस, शेतमांगर त्यादी साठी फाँर्म भरले जातील. आधार कार्ड,७/१२ व आठ उतार,बँक बुक, सदरचा अर्ज भरण्याकरता आधार लिंक असलेला मोबाईल सोबत असणे आदी कागदपत्र आवश्यक आहे.

विलवडे ग्रामपंचायत कार्यालय येथे सकाळी १० वाजत‍ा उपस्थीत राहून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच प्रकाश दळवी व कृषी सहाय्यक रसिका ओसकर यांनी केले आहे.