सेट परीक्षेत जामसंडे श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेतील शिक्षक श्री.सुजित फडके यांचे यश

72

 

देवगड (प्रतिनिधी)

सेट परीक्षेत जामसंडे श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेतील शिक्षक श्री.सुजित फडके यांचे यश

सन २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या अधिव्याख्याता पात्रता (सेट) या स्पर्धा परीक्षेत जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेतील शिक्षक श्री.सुजित संदीप फडके उत्तीर्ण होऊन फिजिक्स या विषयात प्रशंसनीय यश संपादन केले आहे.
सन २०२५ मध्ये पार पडलेल्या या स्पर्धा परीक्षेला महाराष्ट्र व गोवा राज्यातून एकूण ९०३६६ (नव्वद हजार तीनशे सहासष्ट )स्पर्धक प्रविष्ठ झाले होते.त्यात ६०५० स्पर्धक उत्तीर्ण होऊन सेट परीक्षेचा निकाल ६.६९ टक्के लागला.
श्री.सुजित फडके यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष अँड. अजित गोगटे, सचिव- प्रवीण जोग , शाला समिती अध्यक्ष- प्रसाद मोंडकर , मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.