दशावतारी कलाकारांच्या आरोग्य तपासणीचा उपक्रम स्तुत्य ; मिलिंद मेस्त्री यांचे प्रतिपादन

7

 

कणकवली (प्रतिनिधी)

दशावतारी कलाकारांच्या आरोग्य तपासणीचा उपक्रम स्तुत्य ; मिलिंद मेस्त्री यांचे प्रतिपादन

सिंधुदुर्गातील दशावतार कला सातासमुद्रापार नेण्याचे काम दशावतार कलाकारांनी केले आहे. आरोग्य विभागातर्फे दशावतार कलाकारांची आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. यापुढील काळात पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून दशावतार कलाकारांची आरोग्य तपासणीसाठी शिबिर घेतले जाईल, असे प्रतिपादन भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी कलाकारांसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. याचे उद्घाटन मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अण्णा कोदे, बबलू सावंत, दशावतारी कलाकार नाथा नालंग, पप्पू साटम, मारुती सावंत, गुरुनाथ मेस्त्री, पुरुषोत्तम खेडेकर, सुरेश गुरव, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, डॉ. सचिन डोंगरे, डॉ. देशमुख, वैभव फाले, सी. आर. सावंत, पी. डी. कदम, शीतल सावंत, कविता राऊळ, व्ही. जी. जाधव, कक्षसेवक सुनील यादव, ईसीजी तज्ज्ञ किसन ठोंबरे, श्रीमती दाभोलकर, आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. विशाल रेड्डी यांनी मार्गदर्शन केले. दशावतारी कलाकारांच्या कलेचेही कौतुक केले. आरोग्य विषयक मदत दशावतार कलाकारांना लागेल ती दिली जाईल, असे डॉ. शेट्टी यांनी सांगितले. जिल्ह्यातील दशावतारी कलाकारांची मोफत आरोग्य तपासणी महाराष्ट्रात पहिल्यांदाच करण्यात आली. याबद्दल कलाकारांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.