सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक व अधिकारी अशी 11 जणांची टीम मध्यप्रदेश मध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी दौऱ्यावर गेलेली आहे. शासनाकडून जिल्हा परिषद अधिकारी सरपंच ग्रामसेवक यांना गाव विकासासंदर्भात व इतर विविध उपयोजना याकरिता अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या अभ्यास दौऱ्याकरीता जिल्ह्यातील २०१९-२० मधील जिल्हा स्मार्ट ग्राम मधील ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक यांची निवड केली आहे. एकूण 11 जणांची टीम प्रशिक्षण घेण्यासाठी मध्य प्रदेश येथेरवाना झाली आहेतया टीम मध्ये सिंधुदूर्ग जिल्ह्यातील एकमेव महिला सरपंच म्हणून ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेच्या सरपंच सौ मिलन पारसेकर यांचा समावेश आहेत्याचबरोबर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे,वैभववाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, देवगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण शांताराम, कुडाळ पंचायत समितीचे जयप्रकाश जंगले, कुंदे ग्रामपंचायत सरपंच रुपेश ताईशेटये, कोचरा ग्रामपंचायत सरपंच योगेश कोचरेकर, वानीवडे ग्रामपंचायत प्रशासक निलेश जगताप, कुंदे ग्रामपंचायत ग्रामसेवक हनुमंत बाळकृष्ण, कुडासे खुर्द ग्रामविकास अधिकारी ज्योती गवई यांचा या टीममध्ये समावेश आहे.
सदरचा दौऱ्यामध्ये मध्यप्रदेश मधील विविध महत्त्वाच्या ठिकाणची पाहणी,तसेच मध्य प्रदेश मधील पंचायत स्तरावर कसे काम चालते,योजना कशा प्रकारे राबविल्या जातात,अतिमान प्रशासन बाबत ची माहिती कशा प्रकारे कामकाज चालते याची माहिती मिळावी यां करीता 6 मार्च ते 11 मार्च असा अभ्यास दौरा आयोजन करण्यात आला आहे.





