काचेच्या पुलाचा महत्वकांक्षी प्रकल्प उभारल्याने ;  नापणे धबधबा  वाढवतोय वैभवाडीचे  पर्यटनदृष्ट्या महत्त्व

77

 

वैभववाडी (तुषार शिंगाडे)

काचेच्या पुलाचा महत्वकांक्षी प्रकल्प उभारल्याने ;  नापणे धबधबा  वाढवतोय वैभवाडीचे  पर्यटनदृष्ट्या महत्त्व

वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधबा हा बारमाही वाहणारा धबधबा प्रसिद्ध आहे. या धबधब्यावर उभारण्यात आलेला अभिनव संकल्पनेतील काचेचा पूल पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरणार आहे. नैसर्गिक सौदर्याने बहरलेल्या, नटलेल्या या धबधब्याच्या सौदर्यात भर टाकणारा असा हा पूल आहे. त्यामुळे धबधब्याकडे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातुन जिल्ह्यात प्रवेश करतांना वैभववाडी तालुका हा जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे. जिल्ह्यात येणारा पर्यटक हा नापणे धबधब्याला भेट दिल्याशिवाय पुढे जात नाही. दरवर्षी देश विदेशातील हजारो पर्यटक येथे येत असतात. धबधब्याच्या दोन्ही बाजूने हिरवी गर्द झाडी, उंचावरून खोल डोहात पडणारे धबधब्याचे फेसाळणारे पांढरे शुभ्र पाणी, हवेत उडणारे पाण्याचे गार गार तुषार, विविध पक्षांची किलबिल असे विलोभनीय नैसर्गिक दृश्य पर्यटकांना भुरळ पाडते.
हा धबधबा पर्यटनदृष्ट्या विकसित करावा. अशी मागणी करण्यात येत होती. तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यासमवेत धबधब्याची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाला धबधब्या पर्यटन दृष्ट्या विकसित करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर जिल्हा नियोजन कडून सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रस्ताव तयार करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने आर्टिकेटकडून प्लॅन बनवून घेतला. खाली उतरण्यासाठी पायऱ्या, पर्यटकांना आवश्यक प्रस्ताव करण्यात आला होता. राज्यातील अशा प्रक पहिलाच पूल ठरला आहे. काचेच्या सुरुवातीलाच कृत्रिम फुल पाखरू उभारण्यात आले असून पर्यटकांना हा सेल्फी पॉईंट आकर्षित करीत पूल
धबधब्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करीत असतानाच येथे येणाऱ्या पर्यटकांना लागणाऱ्या प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सुलभ शौचालाय, चेंजिंग रूम, यासारख्या सुविधा नसल्यामुळे महिला पर्यटकांची गैरसोय होत आहे.