एआय प्रणालीचा वापर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला पाहिजे – जयप्रकाश परब

33

 

एआय प्रणालीचा वापर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला पाहिजे – जयप्रकाश परब

वैभववाडी (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एआय प्रणाली वापराला गती मिळत आहे. एआय चा प्रथम वापर करण्याचा मान जिल्ह्याला मिळाला आहे. प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी एआय प्रणाली समजून घेतली पाहिजे. वैभववाडी तालुक्यात एआय प्रणाली गतिमान झाली पाहिजे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या प्रणालीमुळे शेती व्यवस्थापन व हवामान याची अचूक माहिती मिळणार आहे. असे प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी केले.   
वैभववाडी पंचायत समिती येथे  एआय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी परब म्हणाले, पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचारी यांनी एआयचा वापर प्रामुख्याने करणे आवश्यक आहे.    
AI ची किती गरज प्रशासकीय कामात आहे.  प्रशासकीय कामात AI चा वापर करून आपण अत्यंत कमी वेळात कशाप्रकारे काम करू शकतो याचे मार्गदर्शन जयप्रकाश परब यांनी केले.     
    यावेळी गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, सर्व खाते प्रमुख अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी MKCL चे  प्रशिक्षक श्री मंगेश गुरव व श्री सतीश मदभावे यांनी सर्व प्रशिक्षणार्थींसाठी प्रशिक्षण दिले.