देवगड – प्रतिनिधी
देवगड येथील राष्ट्रीय लोकअदालतीत ४४ प्रकरणे निकाली
उच्च न्यायालय – मुंबई, राज्य विधी सेवा प्राधिकरण- मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून येथील दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर येथे शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश तथा देवगड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस. एस. पचंडी यांच्या हस्ते झाले. या लोकअदालतीत दिवाणी व फौजदारी खटले तसेच वादपूर्व प्रकरणे अशा ११०८ पैकी एकूण ४४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून १४ लाख १५ हजार ८४० रुपये वसुली झाली.






