करूळ घाटातून उद्यापासून वाहतूक पुरवर्त होणार सुरू

33

 

करूळ घाटातून उद्यापासून वाहतूक पुरवर्त होणार सुरू
वैभववाडी( प्रतिनीधी)
करूळ घाटातील धोकादायक दरडी काढण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, शुक्रवारपर्यंत सर्व काम पूर्ण करून शनिवार १३ सप्टेंबरपासून पूर्ववत वाहतूक सुरू होणार आहे. याबाबत शुक्रवारी अधिकृत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे शाखा अभियंता पवन पाटील यांनी दिली आहे.
करूळ घाटात ४ सप्टेंबर रोजी गगनबावड्यापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर दरडीचा महाकाय भाग रस्त्यावर कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावर पडलेली ही दरड काढत असताना येथे मोठ्या प्रमाणात दरडीला तडे गेल्याचे दिसून आले. त्यामुळे या धोकादायक दरडी कधीही कोसळतील. असा दरडीचा भाग काढल्याशिवाय वाहतूक सुरू करणे धोक्याचे होते.