बिळवस येथील श्री सातेरी देवी जलमंदिर जत्रोत्सवात माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतले दर्शन
मालवण तालुक्यातील बिळवस येथील श्री सातेरी देवी जलमंदिर येथे श्री सातेरी देवीचा जत्रोत्सव आज संपन्न होत असून कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी या जत्रोत्सवास उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले. तसेच जत्रोत्सवानिमित्त सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या. यावेळी देवस्थान मंडळाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.