नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा ३० डिसेंबरला पहाटे अपघात झाला. २५ वर्षीय पंतची मर्सिडीज कार दिल्ली – डेहराडून हायवेवर रोडवरून जात असताना डिव्हायडरला धडकली. या अपघातात ऋषभ पंतच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला खूप दुखापत झाली होती. पंतची आई सरोज पंत आणि लंडनची बहीण साक्षी त्याच्यासोबत मॅक्स हॉस्पिटलमध्ये आहेत. आता ऋषभ पंतच्या आरोग्याचे ताजे अपडेट समोर आले आहेत.
ताज्या अपडेटनुसार ऋषभ पंतच्या प्रकृतीत बरीच सुधारणा होत असून त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा कोणताही निर्णय डॉक्टरांनी घेतलेला नाही. पण सध्या तो आयसीयूमध्ये आहे. पंतच्या काही मित्रांनी त्याला तिथे रुग्णालयात भेट दिल्यानंतर ही माहिती दिली.





