सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य मराठी माध्यमिक शिक्षक संघातर्फे मराठी विषय शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीच्या शिक्षिका विशाखा विश्राम पालव यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल विद्या विकास मंडळ इन्सुली या संस्थेचे अध्यक्ष उमेश अर्जुन पेडणेकर, सचिव केरकर, सर्व संस्था पदाधिकारी, सदस्य, सल्लागार, तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकैतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.





