आचरा खुडी गाडीला पोयरेत अपघात;एसटी रस्ता सोडून घराला धडकली
एसटी चालक बापू काळे याचा उपचारादम्यान मृत्यू
आचरा (प्रतिनिधी)
आचरा येथून दुपारी दोनच्या सुमारास खुडीमार्गे देवगडला जाणाऱ्या गाडीच्या वाहकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने एसटी बस रस्ता सोडून पोयरे गोंदापूर येथील संजय सावंत यांच्या घराला धडकली. ही घटना दुपारी २:३० च्या सुमारास घडली.

मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थ प्रकाश पालव, दीपेश अपराज, नितीन जोईल, अमर अपराज, प्रथमेश पालक, किशोर पालव, पोयरे उपसरपंच समीर तावडे, संजय सावंत, मंगेश पालव यांच्यासह पंधरा-सोळा ग्रामस्थांनी धाव घेत बस मध्ये अडकलेले वाहकांना लोखंडी पाराने दरवाजा तोडत बाहेर काढले.जखमींना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे आणण्यात आले होते.
एसटीची धडक बसल्याने सावंत यांच्या घराची भिंत काही प्रमाणात कोसळून गाडी भिंतीला अडकून एका बाजूला तोलुन राहिली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. चालक बापू लक्ष्मण काळे राहणार तरळे याला जास्त दुखापत झाली असल्याने त्याला ओरोस येथे हलविण्यात आले आहे . तर वाहक राजेंद्र मनोहर जाधव प्रवासी रूही दीनानाथ पडवळ व 21 मिताली प्रवीण मुणगेकर व 19 राहणार कुडोपी यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे डॉ एस बी जाधव डॉ कपिल मेस्त्री यांच्याकडून उपचार करत आले.ग्रामस्थांच्या मते गाडीत शाळेतील विद्यार्थ्यांचे अन्य मिळून 22 ते 23 प्रवासी असण्याचे सांगितले जात आहे. या गाडीतून प्रवास करणारे पोयरे गोंदापूर येथील लक्ष्मण दुखंडे यांनी रस्त्याकडेला खड्डा करून ठेवण्यात आलेल्या मातीच्या ढिगार्यावर एसटीचे चाक गेल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले त्यामुळे हा अपघात झाला असा अंदाज व्यक्त करण्यात आला . घटनेची खबर कळतच देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम हवालदार स्वप्निल ठोंबरे यांनी गोंदापूर येथे जात घटनेच्या पंचनामा केला तर देवगड एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक निलेश लाड स्थानक प्रमुख श्रीकांत सैतावडेकर यांनी ही अपघातस्थळी धाव घेतली. अपघातानंतर गाडीतील प्रवाशांना नातेवाईकांनी अन्य वाहनाने घरी पाठविले.





