सावंतवाडी (प्रतिनिधी)
साटेली-देऊळवाडी येथे एसटी बस व आयशर मध्ये अपघात, एक प्रवासी जखमी
सावंतवाडी साटेली-देऊळवाडी येथे एसटी बस व आयशर मध्ये टेम्पोची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला. ही घटना शनिवारी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात बस मधील काही प्रवासी जखमी झाले असून विश्वनाथ केरकर (रा. मळेवाड) हा गंभीर जखमी झाला होता. त्याला अधिक उपचारासाठी मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, याबाबत अधिक माहिती अशी की, वेंगुर्ल्याहून निघालेली एसटी बस साटेली- देऊळवाडी येथील बस स्टॉपजवळ पोहोचली असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पोसोबत तिची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागांचे मोठे नुकसान झाले.
अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण ४१ प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमी प्रवाशांना मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठवले.






