शिरगाव जि.प.आंबेखोल शाळेच्या सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले

22

शिरगाव जि.प.आंबेखोल शाळेच्या सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले

देवगड प्रतिनिधी

शिरगाव जि.प.शाळेचा सांस्कृतिक सभागृह सौ.उमा लब्दे आणि ज्ञानदेव लब्दे (माजी विध्यार्थी आणि सेवानिवृत्त B. M. C. अधिकारी )या उभयतांनी स्वखर्चाने बांधून दिला त्याचे लोकार्पण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी आमदार राणे यांनी लब्दे कुटुंबीयांचे कौतुक केले .ग्रामीण भागात शैक्षणिक क्षेत्रातील हे योगदान फार मोठे आहे अशा प्रकारच्या योगदानातून शैक्षणिक चळवळींना हातभार लागतो असे कौतुकोदगार काढले .आमदार नितेश राणे यांच्या हस्ते श्री ज्ञानदेव लब्दे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी श्री.मल्हारी कवडे (सेवानिवृत्त अधिकारी )श्री.अजित कवडे (सहसचिव मंत्रालय )श्री.सुजित कवडे,श्री.आशिषकुमार सिंग,श्री.अरुण लब्दे,सौ.रुक्मिणी कवडे ,चिन्मयी लब्दे ,पद्मजा कवडे ,नलिनी कवडे ,श्री.विजय कदम सर संदीप साटम , संतोष फाटक ,अमित साटम ,राजेंद्र शेट्ये ,संभाजी साटम ,R. G. सावंत ,सहदेव लोके,सुभाष नार्वेकर ,वैभव साळस्कर,अरुण पवार ,दाजी राणे,सुहास राणे ,संतोष जंगले आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मोठ्या संख्यने ग्रामस्थ उपस्थित होते.सूत्रसंचालन बापू खरात सर आणि पुरुषोत्तम साटम सर यांनी केले.