…तर सदा ओगले यांनी राजकीय निवृत्ती घ्यावी – शरद लोके
देवगड (प्रतिनिधी)
लिंगडाळ गावातील भाजप पक्ष प्रवेश म्हणजे सदा ओगले यांनी आ नितेश राणे यांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे असे मत शरद लोके (शिवसेना उबाठा विभाग प्रमुख किंजवडे जिल्हा परिषद )यांनी व्यक्त केले.
दिनांक २८/१२/२३ रोजी लिंगडाळ गावात जो पक्ष प्रवेश झाला त्यात शिवसेना उबाठा गटाचा एकही कार्यकर्ता पक्ष सोडून गेला नसून ही फक्त पत्रकार आणि जनतेची फसवणूक आहे. भाजप चे कार्यकर्ते असले लोक फोटोत उभे करून आ नितेश राणे यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम सदा ओगले यांनी केले आहे. लिंगडाळ गावातील शिवसेने सगेल शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहेत. आणि या पुढे राहतील. कालच्या आ नितेश राणे यांच्या उपस्थित भाजप प्रवेश झालेल्या फोटोत एक तरी शिवसैनिक दाखवावा आणि सिद्ध कराव. नाहीतर सदा ओगले यांनी राजकीय निवृत्ती घ्यावी.असे ही लोके म्हणाले.



