हळवल फाटा येथे कार अपघात ; जीवितहानी टळली , कारचालकास किरकोळ जखमी

50

 

कणकवली (प्रतिनिधी)

हळवल फाटा येथे कार अपघात ; जीवितहानी टळली , कारचालकास किरकोळ जखमी

गोव्याहून मुंबई दिशेला  जाणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार महामार्गावरील दुभाजकाला आदळल्याने कार पलटी झाला. सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल-फाटा येथे मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले.
संदीप नायक व दीपक लोहिया, सुधिंद्र प्रभू हे तिघे मेंगलोर येथे देवदर्शनासाठी गेले होते. सोमवारी पाऊस जास्त असल्याने त्यांनी गोव्यात वास्तव्य केले. मंगळवारी दुपारनंतर कारमधून गोव्याहून ते मुंबई दिशेने रवाना झाले. सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास चालक संदीप नायक यांचा ताबा सुटल्याने कार मुंबई-गोवा महामार्गवरील हळवल फाटा येथील दुभाजकाला आदळल्याने पटली. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थ दाखल झाले. त्यांनी कारमध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातात चालक संदीप नायक यांच्या डोक्याला जखम झाली असून अन्य दोघांना कोणतीही दुखापत झाली.