साटेली मायनिंग सुरू करण्यासंदर्भात हालचालींना वेग,संजय नाईक जाणार हरित लवादाकडे
सावंतवाडी –
सावंतवाडी तालुक्यातील साटेली या ठिकाणी मायनिंग उत्खनन गेले सात ते आठ वर्ष सुरू होते. मध्यंतरीच्या कालावधीत काही कारणास्तव सदरचे उत्खनन बंद होते.मात्र पुन्हा एकदा पुढील काही दिवसात सदर ठिकाणी मायनिंग उत्खनन सुरू करण्याबाबत हालचालींना वेग आला आहे.साटेली गावातील ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते संजय नाईक यांनी मायनिंग उत्खनन संदर्भात आवाज उठवला असून मायनिंग उत्खनन केल्यास आपण हरित लवादाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे महाराष्ट्र माझाशी बोलताना माहिती दिली.माळरानावर मशनरी चा वापर करून रस्ता काढण्यात येत असून सदरचा रस्ता हा मायणी उत्खननच्या ठिकाणी जाण्याकरता काढण्यात येत असावा असा अंदाज संजय नाईक यांनी व्यक्त केला असून यावर प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन सदर उत्खननाला परवानगी देऊ नये अशी ही मागणी नाईक यांनी केली आहे.सावंतवाडी तालुक्यातील साटेली व कोंडुरे हे दोन गाव इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येत होते.मात्र साटेरी गावात मायनिंग उत्खनन करण्यात येणार असून सदरचा गाव हा इको सेन्सिटिव्ह मधून वगळला असल्याबाबतच्या कोणत्याही ठोस पुरावानसून शासन परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले नसल्याची माहिती नाईक यांनी दिली.सदर साटेली गावातील इकोसिन्सिटी झोनमध्ये करण्यात येणारे मायनी उत्खन बाबत खनिजर्व विभागाची बघायची भूमिका असल्याचेही नाही घेणे सांगितले.जर साटेली गाव इकोसिन्सिटीव्ह झोन मधून अद्याप पर्यंत वगळण्यात आलेला नसेल तर या ठिकाणी मायणी उत्खननला परवानगी कशी देण्यात येईल असा प्रश्नही नाईक यांनी उपस्थित केला आहे.
संजय नाईक यांच्या या भूमिकेमुळे बऱ्याच दिवसाच्या कालावधीनंतर सुरू होणारे साटेली मायनिंग उत्खनन पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात सापडण्याची दाट शक्यता आहे.





