मळेवाड नदीपात्रात मगरीचे साम्राज्य ; वनविभागाने तात्काळ कार्यवाही करावी ग्रामस्थांची मागणी
मळेवाड (हेमंत मराठे)
मळेवाड नदीपात्रात मगरींचे फार मोठे साम्राज्य पसरले असून यामुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे.मळेवाड म्हापसेकरवाडी येथील नदीत पात्रात असलेल्या मगरीने एका जिवंत कुत्र्याचा फडशा पाडला.यावेळी नदीवर असणाऱ्या एका महिला बाल बाल बचावली.नदीत दिवसाढवळ्या दिसणाऱ्या मगरींमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून यासंदर्भात वनविभागणे तात्काळ कार्यवाही करावी.मळेवाड पात्रात असलेल्या मगर पकडण्यासाठी तात्काळ वनविभागणे मोहीम हाती घ्यावी अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थातून केली जात आहे.





