वृषाली यादव यांनी स्वीकारला देवगड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार

154

वृषाली यादव यांनी स्वीकारला देवगड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार

देवगड (स्वप्नील लोके)

पंचायत समिती देवगडचे गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांची प्रकल्प संचालक जल जीवन मिशन पदी पुणे येथे बदली झाल्याने देवगड रिक्त जागी पंचायत समिती सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा येथे सहाय्यक गटविकास म्हणून कार्यरत असलेले सहाय्यक गटविकास अधिकारी वृषाली यादव यांना गटविकास अधिकारी वर्ग १ पदोन्नती प्राप्त झाली आहे त्या पदोन्नतीने पंचायत समिती देवगड येथे गटविकास अधिकारी पदी रुजु झाल्या आहेत. यावेळी त्यांचे स्वागत सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश जगताप ,कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, अधिक्षक मेधा राणे , कनिष्ठ लेखाधिकारी विनय प्रभु , कृषि अधिकारी दिगंबर खराडे , विस्तार अधिकारी अंकुश जंगले, विस्तार अधिकारी प्रतिमा वळंजु , कृषि विस्तार अधिकारी अभिजित मदने, वरिष्ठ सहाय्यक स्वप्नजा बिर्जे , उमेश ठाकुर व ग्रामविकास अधिकारी रामदास हडपिडकर ,कर्मचारी , ग्रामविकार अधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते . यावेळी सर्वानी प्रशासकीय कार्यात पुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.