देवगड : देवगडच्या समुद्रामध्ये काल शनिवारी पुणे – पिपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडेमीच्या चार विद्यार्थिनींचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आज देवगड येथे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली. बुडालेल्यांपैकी राम डिचोलकर हा विद्यार्थी अद्यापही बेपत्ता आहे. त्याची शोध मोहिम जोरदार सुरू असून आज स्कुबा डायव्हिंगची पथके मरीन पोलीस बोट यांच्यासह अनेक मच्छीमार राम डिचोलकरचा शोध घेत आहेत.
आज पहाटेपासून प्रांताधिकारी जगदीश काकतकर, तहसीलदार आर. जे. पवार यांच्यासह महसूलची टीम देवगड किनारपट्टीवर राम डिचोलकर याच्या शोध कार्यात लक्ष ठेवून आहे.





