बांदा : बांदा बस स्टॅन्ड नजीकच्या विहिरीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह निदर्शनास आला आहे. स्थानिकांनी याबाबतची माहिती बांदा पोलिसांना फोनवरून दिली. दोन दिवसांपासून स्टॅन्ड परिसरात एक वेडसर व्यक्ती फिरत होती. सदर व्यक्ती तीच असावी, असा प्राथमिक अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला. अद्याप मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आलेला नाही. मृतदेह बाहेर काढल्यानंतरच त्याची ओळख पटणार आहे.





