मुंबई : कांद्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. केंद्र सरकार लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेईल, पियुष गोयल यांनी फडणवीसांना आश्वासन दिले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्टिटवरुन माहिती दिली आहे.
कांदा निर्यातबंदीनंतर महाराष्टातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांचं गोयल यांना भेटून निवेदन दिलं. सह्याद्री अतिथीगृहावर पियुष गोयल आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. देवेंद्र फडणवीसांनी स्वत: ही माहिती दिली आहे. फडणवीस म्हणाले, शेतकरी बांधवांचे महत्त्वाचे प्रश्न कांदा, कापूस व सोयाबीन या विषयांवर केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यासह एक सकारात्मक बैठक सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे झाली. पियुष गोयल यांनी शेतकरी हिताचे सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन या बैठकीत दिले.
कांदा प्रश्नावर सोमवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक –
कांदा प्रश्नावर सोमवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. मंत्री पीयुष गोयल यांच्यासोबत होणार बैठक होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याच्यासह नाशिकमधील व्यापारी राहणार बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्राने कांदा निर्यात बंदी केल्याने जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद आहेत. मंत्री पियुष गोयल, नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांची माहिती आहे. दिल्लीत होणाऱ्या बैठकीत काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.





