फक्त १७ सेकंदाचा खेळ!, अखेर उत्तम पाटीलने मारली बाजी! ; महिलांमध्ये रेश्मा केवटे अव्वल.

34

पुणे : बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉन स्पर्धेत 21.1 किलोमीटर प्रकारात उत्तम पाटीलने प्रथम क्रमांक पटकावला. त्याने 21.1 किलोमीटरचे अंतर 1 तास 5 मिनीटे अन् 4 सेकंदात पूर्ण केले. सुशांत जेधेने दुसऱ्या क्रमांकावर शर्यत पूर्ण केली. सुशांत जेधे आणि उत्तम पाटीलमध्ये फक्त 17 सेकंदाचे अंतर राहिले. सुशांतने 1 तास 5 मिनिटे 21 सेंकद वेळ नोंदवली.

महिलांमध्ये 21.1 किलोमीटरची मॅरेथॉन रेशमा केवटेने जिंकली. तिने 1 तास 13 मिनिटे अन् 18 सेकंद अशी वेळ नोंदवली. 10 किलोमीटर हाफ मॅरेथॉनमध्ये महिला विभागात साक्षी जडियालने 36 मिनिटे 52 सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. तर पुरूष विभागात असिफ खानने 30 मिनिटे 25 सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला.