सावंतवाडीत विवाहितेने गळफास घेत संपविले जीवन..!

182

सावंतवाडी : मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील एका विवाहित महिलेने सावंतवाडी येथील भाड्याच्या घरात गळफास लावून आज आत्महत्या केल्याची घटना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सबनीसवाडा येथे घडली. चैत्राली निलेश मेस्त्री (वय ३२) असे मयत महिलेचे नाव आहे.
दरम्यान सदर घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. अधिक तपास सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संबंधित महिला ही मुळची खेड (रत्नागिरी) येथील आहे. ती आपला दिर संदेश यांच्या समवेत सबनीसवाडा येथे एका भाड्याच्या घरात राहत होती. आज दुपारी तिने ओढणीच्या साह्याने गळफास लावून घेतला. हा प्रकार दिराच्या लक्षात आल्यानंतर त्याने ओढणी सोडण्याचा प्रयत्न केला. परंतु गाठ सुटली नाही त्यामुळे आग लावून ओढणी जाळली व तिचा मृतदेह खाली उतरला. परंतु तत्पूर्वी तिचे निधन झाले होते. याबाबतची माहिती त्याने ११२ नंबरच्या माध्यमातून पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत, अधिक तपास सुरू आहे. तिने आत्महत्या नेमकी काय केली? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

दरम्यान, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले, उपनिरिक्षक गजानन भालेराव, आनंद यशवंते, पोलीस हवालदार प्रसाद कदम, रामदास जाधव, संतोष गलोले आदींनी त्या ठिकाणी धाव घेतली असून अधिक तपास सुरु आहे.